गुन्हेजळगाव शहर

बापरे..! जमखी केल्यावरही तरुणीकडून सुरु होता तरुणावर चाकू हल्ला, जळगावच्या घटनेचा VIDEO व्हायरल.

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मे २०२३ । सोशल मीडियावर व्हायरल कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. दररोज काहीना काही व्हायरल होत असते. यातील काही व्हिडीओ खळबळ उडवून देणारे असतात. असाच काहीसा प्रकार जळगावमधून समोर आला आहे.

सध्या सोशल मीडियावर तरुण तरुणीचा भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात चक्क तरुणीनेच युवकावर आपल्याकडे असलेल्या चाकून वार करत त्याला जखमी केले आहे. एवढेच नाही तर तो जखमी झाल्यानंतरही तरुणीकडून त्याच्यावर पुन्हा पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला जात होता. हेच चित्र त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून दिसून येत आहे. अद्याप या व्हिडीओ संदर्भात पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे तरुण तरुणी नेमके कोण आणि कशावरून वाद सुरु आहे, याबाबत माहिती नाही. 

जळगाव शहरातील अजिंठा चौकात हा प्रकार रविवारी घडला आहे. भरदिवसा एका तरुणीने शिवीगाळ करून एका तरुणावर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केला. एक तरुण आणि तरुणीचा भर चौकात गोंधळ सुरु होता. यावेळी त्या दोघांमधील वाद वाढत गेल्यानंतर काही वेळाने तरुणीने आपल्याकडचा छोटा चाकू काढून तरुणाच्या छातीत वार केला.

यात तरुण गंभीर जखमी झाला असून या घटनेचा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. सुमारे अर्धा ते पाऊण तास हा गोंधळ सुरु होता. मात्र पोलिस ठाण्यात अद्यापही या घटनेबाबत कुठलीच नोंद नव्हती.

काय दिसतंय व्हायरल व्हिडिओत?
एक तरुणी हातात चाकू घेऊन आपल्या सोबतच्या तरुणाला रागाने बोलत आहे. तर याच सुमारास या तरुणीने तरुणाच्या छातीवर चाकूने वार केल्याचे दिसत आहे. त्यामुळे अंगातील शर्ट पूर्ण लाल झाले आहे. काही मिनिटात हा तरुण देखील अंगातील शर्ट काढून टाकत आहे. तरुणीसोबत कोणत्याततरी कारणावरून वाद घालत आहे. दुसरीकडे तरुणी आपल्या हातातील चाकूच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा वार करण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसऱ्या बाजूला असणाऱ्या मात्र व्हिडिओत नास दिसणारी एक महिला तरुणीला चाकू जमिनीवर टाकून देण्याची विंनती करत असल्याचे व्हिडिओतून ऐकू येत आहे. सद्यस्थितीत हा व्हिडीओ व्हायरल झाला असून याबाबत पोलिसांनी अद्याप कारवाई केली नसल्याचे समजते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button