जागतिक हवामान संघटनेकडून भारतातील मोसमी पावसाचा अंदाज जारी, कसा राहणार पाऊस?

मे 6, 2023 12:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२३ । यंदा अवकाळीने देशभरात धुमाकूळ घातला आहे. ऐन उन्हाळ्यात मान्सूनसारखा पाऊस होत असल्याने देशात यंदाचा मान्सून कसा राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, अशातच जागतिक हवामान संघटनेकडून भारतातील मोसमी पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. या अंदाजानुसार दक्षिण आशियाच्या बहुतांश भागांमध्ये हा पाऊस सरासरी किंवा त्याहून कमी होईल. 

rain monsoon

जागतिक हवामान संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ला निना सातत्याने अनुभवल्यानंतर त्याचा प्रभाव मार्च २०२३मध्ये संपला. त्यानंतर ला निनाची परिस्थिती तटस्थ स्थितीमध्ये बदलली. नैऋत्य मोसमी पावसाच्या काळातच एल निनोची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जागतिक हवामान संघटनेने वर्तवली आहे. मात्र मान्सूनला सुरुवात होताना एल निनो किती सशक्त असेल, त्याबद्दल आत्ता अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. एल निनो परिस्थितीमुळे नैऋत्य मोसमी पाऊस हा सरासरी किंवा त्याहून कमी पडतो. पण मान्सूनवर परिणाम करणारा हा एकमेव घटक नाही.

दक्षिण आशियाच्या वायव्येकडील काही भागात, मध्य आणि ईशान्येकडे सरासरीहून कमी पाऊस पडेल असा अंदाज आहे. तर उत्तर आणि वायव्येच्या उर्वरित भागात तसेच पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे सरासरीहून अधिक पाऊस पडू शकतो, असा अंदाज आहे. या काळात दक्षिण आशियाच्या बहुतांश भागांमध्ये किमान आणि कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असू शकते. नैऋत्य मोसमी पाऊस हा भारताच्या अर्थकारणासाठी महत्त्वाचा आहे. दक्षिण आशियाचा श्रीलंका आणि भारताच्या दक्षिणेकडील भाग वगळता वार्षिक पावसाच्या ७० ते ८० टक्के पाऊस हा नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मिळतो.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now