जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२३ । भुसावळ शहरातील जळगाव रोडवरील मुक्ताई कॉलनीत शेतकर्याच्या बंद घरातून चोरट्यांनी तब्बल साडेपाच लाखांचा ऐवज भर दिवसा लांबवल्याची घटना समोर आली आहे. पर्यायी शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
भुसावळ शहरातील जळगाव रोडवरील मुक्ताई कॉलनीतील मंगलमूर्ती हाईटस्मध्ये शेतकरी तुलसीदास चुंद्रकांत चौधरी (67) हे पत्नी कल्पनासह वास्तव्यास आहेत. मंगळवारी सकाळी पावणेसात वाजता तुळशीदास चंद्रकांत चौधरी हे आमोदा (ता.यावल) येथे वडिलांच्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी गेल्याने जाताना त्यांनी मुख्य दरवाजाची केवळ कडी लावली तर सेप्टी डोअरला कुलूप लावले व हीच संधी चोरट्यांनी साधली. वरच्या मजल्यावरील राहुल वाघोदे यांनी घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिल्यानंतर चौधरी कुटूंब दुपारीच तातडीने शहरात दाखल झाले व त्यांनी शहर पोलिसांना माहिती कळवली.
चोरट्यांनी 48 ग्रॅम वजनाचा एक लाख 20 हजार रुपये किंमतीचा नेकलेस, 50 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा नेकलेस, 75 हजार रुपये किंमतीचा नेकलेस, 75 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, 12 हजार 500 रुपये किंमतीच्या अंगठ्या, 22 हजार 500 रुपये किंमतीची अंगठी, 12 हजार 500 रुपये किंमतीचा सोन्याचा कॉईन, 25 हजार रुपये किंमतीचा दहा ग्रॅमचा वेढा, 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे लॉकेट, 12 हजार 500 रुपये किंमतीच्या सोन्याच्या रींगा, 12 हजार 500 रुपये किंमतीच्या सोन्याच्या दोन लहान अंगठ्या, अडीच हजारांचे कानातील झुमके, दहा हजार रुपये किंमतीचे चांदीचे कॉईन तसेच 60 हजारांची रोकड असा एकूण पाच लाख 40 हजार रुपये किंमतीचा ऐवज लांबवला. सुमारे 20 तोळे वजनाचे दागिणे लांबवण्यात आले असून त्याचे बाजारमूल्य सुमारे 12 लाखाहून अधिक आहे मात्र पोलीस तक्रारीत जुन्या दरानुसार ऐवजांचे मूल्य दर्शवण्यात आले आहे.