⁠ 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | संजय पवार लवकरच राष्ट्रवादीतून ‘आऊट’ ! – गुलाबराव देवकर

संजय पवार लवकरच राष्ट्रवादीतून ‘आऊट’ ! – गुलाबराव देवकर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २६ एप्रिल २०२३ |जळगाव ग्रामीण मध्ये संजय पवार हे कुणाचे काम करतात हे सर्व जनतेला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेवारीवर दावा करुन जनतेची दिशाभूल करण्याचे काम करु नये. उलट त्यांचा राष्ट्रवादीत प्रवास किती दिवसाचा आहे हे लवकरच कळेल. असा पलटवार माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी केला.

पालकमंत्री गुलाबराव पाटील व संजय पवार यांची अंतर्गत युती असून संजय पवार यांनी कधीही माझे काम न करता निवडणुकीत गुलाबराव पाटील यांचे गुप्तपणे काम केले आहे. त्यामुळे त्यांनी दिशाभूल करणे थांबावे, राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणे त्यांच्यासाठी शक्य नाही उलट लवकरच ते पक्षातून आऊट होतील असेही देवकर म्हणाले.

जिल्हा बॅक अध्यक्ष निवडणुकीत संजय पवार यांनी पक्ष नेत्यांना धोका देऊन विरोधकांशी हातमिळवूनी करुन अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांचा पराभव केला. वास्तविक पाहता जिल्हा बँकेत सर्वपक्षीय पॅनल असल्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा फॉम्युला ठरला होता. असे असतांना संजय पवार यांना शिवसेना शिंदे गटाने देखील साथ देऊन राष्ट्रवादीला धोका दिला. असे देवकर म्हणाले.

गुलाबराव पाटील यांच्या व्यासपीठावर उपस्थित राहून त्यांच्या विरुध्द लढण्याची भाषा म्हणजे ही नुरा कुस्ती झाल्या सारखे आहे त्यामुळे हे भाष्य हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादीत ते राहणार का ? हे लवकरच कळेल असे सांगून देवकर यांनी पवार यांचे राष्ट्रवादीतील पुढचे राजकीय भाकीत सांगून टाकले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह