जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२३ । आज पाचोरा येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणारअसून यानिमित्ताने ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत दोन दिवस आधीच जळगावात आले आहे. यादरम्यान, संजय राऊतांनी एक मोठा दावा केला असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय म्हणाले राऊत?
आगामी 15 दिवसांत महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.तर या सरकारचं ‘डेथ वॉरंट’ निघाले असल्याचं राऊत म्हणाले आहे. राऊत यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
दरम्यान यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, प्रत्येकजण आपापली गणित मांडत आहेत. आम्ही मात्र निकालाची वाट पाहतोय. सध्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या 40 लोकांचं जे काही राज्य आहे, ते पुढील 15 ते 20 दिवसांत गडगडल्या शिवाय राहणार नाही, असे राऊत म्हणाले.
तर मी मागे देखील एकदा म्हणालो होतो की, फेब्रुवारीपर्यंत सरकार पडेल. पण न्यायालयाचा निकालच उशिरा लागत आहे. पण हे सरकार टिकत नाही, या सरकारचा ‘डेथ वॉरंट’ निघालेलं आहे. आता सही कोणी आणि कधी करायची हे ठरलं, असल्याचं राऊत म्हणाले आहे.