⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

मलनिस्सारण योजनेच्या प्रकल्पासाठी सहा महिन्यापासून मनपाला नाही सापडली जागा !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 19 एप्रिल 2023 । शहरातील अमृत २. ० अंतर्गंत मलनिस्सारण योजनेच्या जलशुध्दीकरण प्रकल्पासाठी महापालिकेला जागा मिळत नसल्याचे समोर आले आहे. गेल्या सहा महिन्यापासून महापालिका प्रशासनाकडून जागेचा शोध सुरु आहे. मात्र, अद्यापपर्यंत महापालिकेने एकही जागा निश्चित केलेली नाही.

शासनाकडून जळगाव शहरासाठी अमृत योजना मंजुर करण्यात आली आहे. या योजनेचा पहिला टप्पा अंतिम स्टेजला आहे तर, दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. त्यासाठी अमृत २.० चा डीपीआर बनविण्याचे काम कोणाला द्यावे, यावरून गेल्या आठ महिन्यापासून खूप मोठे वाद निर्माण झाले होते. या वादावर अखेर पडदा पडला असून मागील महासभेत सदर डीपीआर बनविण्याचे काम मुंबई येथील एका एजन्सीला देण्यातचा ठराव करण्यात आला.

परंतु अमृत २.० मध्ये होणाऱ्या मलनिस्सारण योजनेच्या प्रकल्पासाठी दोन ठिकाणी जागांची आवश्यकता आहे. त्या जागा अद्यापही महापालिका प्रशासनाकडून निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. गेल्या सहा महिन्यापासून मनपा प्रशासनाकडून जागांचा शोध सुरु आहे परंतु तरीही जागा निश्चित न झाल्यामुळे जलशुध्दकरण प्रकल्पाच्या कामाला बे्रक लागणार आहे.

शहरात ५ झोन मध्ये मलनिस्सारण योजनेचे काम होणार आहे. यापैकी झोन १ व ४ चे काम पहिल्या टप्प्यात झाले असून दुसऱ्या टप्प्यात झोन २,३,५ चे काम होणार आहे. पहिल्या टप्प्यात २२० किमीची मल वाहिणी टाकण्याचे काम झाले असून ४८ एमएलडीचे शुध्दीकरण प्रकल्प जुना खत कारखान्याजवळ उभारण्यात आला आहे.