⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | खान्देशात आली ‘कृत्रिम मंदी’ अन् केळीचे गडगडले भाव !

खान्देशात आली ‘कृत्रिम मंदी’ अन् केळीचे गडगडले भाव !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२३ । गेल्या काही महिन्यांपासून केळीची मागणी वाढलेली पाहायला मिळावी. यामुळे शेतकऱ्यांच्या केळीला तब्बल २७०० रूपये भाव मिळाला. मात्र व्यापाऱ्यांनि आणलेल्या कुत्रिम मंदीमुळे किमान १ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल इतके केळीचे भाव गडगडले असल्याचे म्हटले जात आहे.

२७०० रुपयांवरून २ हजार ते १८०० इतके केळीचे भाव कमी झाले आहेत. केळी उत्पादक शेतकरी कमालीचा हवालदिल झाला आहे. खान्देशातील शेतकऱ्यांच्या डिसेंबर २०२२ ते ३० मार्च २०२३ पावेतो केळी मालाला २७०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. मात्र कुत्रिम मंदीमुळे शेतकऱ्याचे चांगलेच हाल झाल्याचे पाहायला मिळाले.

आता प्रश्न तुम्हाला पडला असेल की ही कृत्रिम मंदी नक्की कशामुळे पाहायला मिळाली? तर झालं असं की, इराकचे काही व्यापारी रावर तालुक्यात खरेदीसाठी आले आहेत. अशा प्रकारची अफवा तालुक्यात पसरली गेली. यामुळे काही शेतकऱ्यांनी भाव वाढवण्याची वाट पाहिली आणि केळीची नियमित कापणी थांबवली. यामुळे त्यावेळी मिळणारा भाव पुढे मिळाला नाही.


तर दुसरीकडे सोशल मीडियावर नेहमीप्रमाणे हवामानाचा अंदाज वायरल झाला. वादळ, गारपीट, पावसाच्या तडाख्यामध्ये केळी सापडू नये म्हणून काही शेतकऱ्यांनी खतांचा भडीमार या केळींवर केला. त्यानंतर जहाजांची उपलब्धता नसल्यामुळे निर्यात होणारे केळी कोल्ड स्टोरेज मध्ये पडून आहेत. अशी अफवा पसरली. पर्यायी केळी खरेदीदार व्यापारी केळीचा मागणीत घट झाल्याचा बागलबुवा उभा केला. यामुळे व्यापाऱ्यांनी केळी भागात कृत्रिम मंदी आणली आणि स्वस्त भावांमध्ये केळी विकत घेतली.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह