⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | कृषी | जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना २० कोटी ४२ लाखांची मदत; वाचा सविस्तर

जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना २० कोटी ४२ लाखांची मदत; वाचा सविस्तर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १२ एप्रिल २०२३ | राज्यात ४ ते ८ आणि १६ ते १९ मार्चला अवकाळी पाऊस झाला होता. यात जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांनाही मोठा फटका बसला होता. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात ११ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रफळाला फटका बसून तब्बल १८ हजार ३६४ शेतकर्‍यांचे नुकसान झाल्याची नोंद झाली. अवकाळी पावसामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी सरकारने २० कोटी ४२ लाख ६१ हजार रुपयांची भरपाई वितरित केली आहे.

गतवर्षा प्रमाणे यंदाही अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मार्च महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी सरकारने १७७ कोटी ३९ लाख ९१ हजार रुपयांची भरपाई वितरित केली आहे. त्यात नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, नगर जिल्ह्यातील ७० हजार ६६६ शेतकर्‍यांसाठीच्या ६३ कोटी ९ लाख ७७ हजार रुपयांच्या मदतीचा समावेश आहे.

जिल्हानिहाय मदत मिळालेल्या शेतकर्‍यांची संख्या, दोन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे असून (कंसात शेतकर्‍यांना वितरित करण्यात आलेला निधी) : धुळे-८ हजार ७१७-३ हजार ९४४ हेक्टर २ आर (६ कोटी ७५ लाख ९८ हजार), नंदूरबार-८ हजार ८३६-४ हजार ७३० हेक्टर ४ आर (८ कोटी १३ लाख २३ हजार), जळगाव-१८ हजार ३६४-११ हजार ९११ हेक्टर ९ आर (२० कोटी ४२ लाख ६१ हजार).

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.