⁠ 
गुरूवार, डिसेंबर 5, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | खळबळजनक : पत्नीची चाकू भोसकून पतीने केली हत्या

खळबळजनक : पत्नीची चाकू भोसकून पतीने केली हत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२३ । कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त पतीने पत्नीची चाकूने वार करीत हत्या केली असल्याची घटना राज्यात घडली आहे. वाडी, ता.नागपूर ग्रामीण शहरातील नवनीतनगरात गुरुवारी रात्री ही घटना घडली. यामळे एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी पती मनोज ज्ञानेश्वर सरोदे (50) याला आर्वी (जिल्हा वर्धा) येथून अटक करण्यात आली. माधुरी मनोज सरोदे (40) असे मृत पत्नीचे नाव आहे. मनोज मूळचा आर्वी येथील रहिवासी असून, तो मागील सहा महिन्यांपासून वाडी शहरातील नवनीतनगरात बालपांडे यांच्या घरी किरायाने राहतो. तो एमआयडीसी परिसरातील केबल कंपनीमध्ये तर माधुरी सिंपलेक्स कंपनीत कामगार म्हणून काम करायची.

त्याला दारूचे व्यसन होते. माधुरीच्या डोके, पोट व तोंडावर चाकूने वार केल्याच्या जखमा असल्याने तिचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले.हा प्रकार उघड होताच शेजार्‍यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस उपायुक्त अनुराग जैन, सहायक आयुक्त प्रवीण तिजाडे, पोलिस निरीक्षक प्रदीप रायण्णावर यांनी घटनास्थळ गाठून पाहणी करीत पंचनामा केला.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह