परमेश्वर तुमचं भलं करो : उद्धव ठाकरेंना गुलाबरावांचा टोला
जळगाव लाईव्ह न्यूज : ७ एप्रिल २०२३ : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री ना गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोर दार हल्लाबोल केला.
आमचा पक्ष फोडणाऱ्यांसोबत उद्धवसाहेब जाऊन बसले आणि आम्हाला गद्दारांच्या रांगेत उभं केलं आहे. पण साहेब आम्ही ४०-४०, ५०-५० खटले आमच्या अंगावर घेऊन ही शिवसेना उभी केली आहे. १९९२ च्या दंगलीत आम्ही तिघे भाऊ आणि आमचा बापही चार महिने तुरुंगात राहिला. केवळ शिवसेना हा शब्द खाली जाता कामा नये म्हणून आम्ही बलिदान दिलं, शिवसैनिकांनी बलिदान दिलं. त्या बलिदान देणाऱ्या शिवसैनिकाना तुम्ही गद्दार म्हणत असाल आणि या गद्दारांच्या भरवशावर खासदार झालेल्या संजय राऊतला तुम्ही खुद्दार म्हणत असाल तर परमेश्वर तुमचं भलं करो असा उपरोधिक टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
यावेळी ते म्हणाले कि, रायगड येथील कार्यक्रमात बोलतांना ना. गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. ज्या कॉंग्रेसने आम्हा शिवसैनिकांना तुडवलं, ज्या कॉंग्रेसने आम्हाला संपवलं. ज्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने तीन वेळा आमचा पक्ष फोडला. त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे मांडीला मांडी लावून बसला आहात. राष्ट्रवादीने तीन वेळा आमचा पक्ष फोडला. आधी छगन भुजबळांना फोडलं, मग नारायण राणेंना आणि मग राज ठाकरे यांना फोडलं. आज तुम्ही त्याच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांसोबत जाऊन बसला आहात