भीषण अपघात : जळगावच्या कारचालकाचा धुळ्यात अपघाती मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज : १९ मार्च २०२२ : कारवरील नियंत्रण सुटल्याने जळगावच्या कारचालकाचा धुळ्यात अपघाती मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. भागचंद बन्सीलाल जैन असे या मयत चालकाचे नाव आहे
अधिक माहिती अशी की, भरधाव वेगाने जाणारी कार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळ्या नजीक रेल्वे उड्डाण पुलावर शुक्रवारी रात्री उलटली. यात गंभीर झालेल्या चालकाचा मृत्यू झाला आहे.
जळगाव येथील भागचंद जैन हे एम.एच.५.सी.एम.५३३१ क्रमांकाची कार घेऊन नाशिककडून जळगावच्या दिशेने येत होते. डोळ्याजवळ असलेल्या उड्डाण पुलावर त्यांच्या वाहनावरील ताबा सुटला आणि कार पुलाच्या कठड्याला धडकली. त्यानंतर ती उलटली सुद्धा. या अपघातात त्यांच्यासोबत असलेले अनिकेत जैन हे गंभीर जखमी झाले आहेत.
भागचंद जैन यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असून अनिकेत जैन यांच्यावर उपचार सुरू आहेत याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे घटनेचा तपास पोलीस नाईक एन जे देवरे करत आहेत.