⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | नोकरी संधी | भुसावळ आणि एरंडोल येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात निघाली भरती, ‘एवढा’ पगार मिळेल..

भुसावळ आणि एरंडोल येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात निघाली भरती, ‘एवढा’ पगार मिळेल..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव अंतर्गत भुसावळ आणि एरंडोल येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची जाहिरात निघाली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 13 मार्च 2023 पासून सुरु झाली असून पात्र उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने 20 मार्च 2023 पर्यंत पाठवावा. लक्ष्यात असू द्या ही भरती 6 महिने कालावधीसाठी करार पद्धतीने केली जणार आहे याची नोंद घ्यावी

जागा : प्रत्येकी एक एक जागा

भरले जाणारे पद : उपविभाग स्तरीय समन्वयक

शैक्षणिक पात्रता –
१. शासनमान्य विद्यापिठाची MSW पदवी
२. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक MS-CIT ( शासन मान्य प्रमाणपत्र) (MD-Office चे ज्ञान आवश्यक)
३. मराठी टंकलेखन ३० व इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रती मिनीट या अहर्तेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावे.
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

पगार : दरमहा 13,000 रुपये मिळतील

नोकरी ठिकाण : भुसावळ आणि एरंडोल
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहोचण्यासाठी शेवटची तारीख : 20 मार्च 2023

उपविभागीय अधिकारी कार्यालय, एरंडोल : जाहिरात पहा
उपविभागीय अधिकारी कार्यालय, भुसावळ : जाहिरात पहा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.