नामांकित दवाखान्यातून तरुणी झाली पसार अन्…!

मार्च 14, 2023 12:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज : १४ मार्च २०२३ : जळगाव शहरातील एका नामांकित स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरच्या दवाखान्याच्या मेडिकलमध्ये काम करत असलेली तरुणी बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

girl missing jpg webp

अधिक माहिती अशी कि, जळगाव शहरातील गजबजीच्या ठिकाणी संबंधीत डॉक्टरचा दवाखाना आहे. या डॉक्टरच्या दवाखान्यात औषध दुकानात तरुणीच्या आईने शनिवारी (ता. ११) सकाळी १० वाजता दवाखान्यात सोडले होते. मात्र दुपारी पोटात दुखत असल्याचे कारण सांगून तरुणी निघून गेली.

जाताना आपली पर्स आणि सामान मेडिकलमध्ये सोडून गेली. सायंकाळी तिची आई तिला घेण्यासाठी आली. मात्र, तुमची मुलगी दुपारीच पोट दुखत असल्याचे कारण सांगून बाहेर गेल्याचे तिच्या आईला सांगण्यात आले.

संबंधित तरुणीचा पालकांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती कुठेही सापडली आली नाही. अखेर जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार देखल करण्यात आली .पोलिस नाईक फिरोज तडवी तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now