⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

रिक्षा चालकाच्या पोरीचा सातासमुद्रापार झेंडा.. झाली मर्चंट नेव्हीमध्ये चीफ ऑफिसर

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२३ । बोदवड तालुक्यातील छोट्याशा चिखली या गावातील रिक्षा ड्रायव्हरची मुलगीअसलेली कु.वैष्णवी ज्ञानेश्वर पाटील हिने आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ‘मर्चंट नेव्ही’ मधील चीफ ऑफिसर या पदाला गवसणी घातली आहे.

घर म्हणावं तर अगदी दहा बाय दहाची खोली सत्कार करणाऱ्याला घरात फोटो घेता येत नाही म्हणून घराबाहेरच्या अंगणात फोटो घ्यावा लागला.. पोरीचं कौतुक करावं तेवढं थोडं

वैष्णवीच्या यशानं ग्रामीण भागातल्या मुलींमध्ये चैतन्य संचारेल आणि तिच्याकडून प्रेरणा घेऊन प्रतिकूलतेवर मात करत विविध क्षेत्रात ग्रामीण भागातल्या मुली यशस्वी बाजी मारतील यात शंका नाही.यामुळे तिचा सत्कार खास तिच्या गावी गेलेले मराठा सेवा संघाचे विभागीय कार्याध्यक्ष शिवश्री राम पवार ,जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा लीना पवार ,लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे , श्रीराम पाटील, समवेत जिल्हाध्यक्ष अनिल पाटील , संजय पांडुरंग पाटील, विलास सटाले, मधु पाटील यांच्यातर्फे देण्यात आला.