जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२३ । या महिन्याच्या (फेब्रुवारी) सुरुवातीला सोन्याच्या (Gold Rate) किमतीत मोठी वाढ दिसून आली. 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याचा दर तब्बल 58800 रुपायांहून अधिकने प्रति तोळ्यापर्यंत गेला होता. मात्र त्यांनतर सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आलीय. तुम्हीही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. सलग तिसऱ्या आठ्वड्यात सोने स्वस्त झाले आहे. या संपूर्ण आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याशिवाय चांदीही (Silver Rate) स्वस्त झाली आहे.
सोने त्याच्या उच्चांक दरापासून 2900 रुपयांपेक्षा स्वस्त आहे. तर चांदी देखील 1300 रुपयांनी घसरली आहे. या संपूर्ण आठवड्यात सोन्याच्या दरात किती घसरण झाली आहे ते पाहूया.
सोने किती स्वस्त झाले?
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, 20 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 56,578 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर होता. दुसरीकडे, 25 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 55,957 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर होता, त्यामुळे या संपूर्ण आठवड्यात सोन्याच्या दरात 630 रुपयांची घसरण झाली आहे.
सोने 2925 रुपयांनी स्वस्त होत आहे
IBJA च्या वेबसाइटनुसार, 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याची किंमत विक्रमी उच्चांकावर होती. या दिवशी सोन्याचा भाव 58,882 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला होता. त्याच वेळी, सोन्याचा भाव सध्या 55,957 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. त्यानुसार यावेळी सोने 2925 रुपयांनी स्वस्त होत आहे.
चांदी 1300 रुपयांनी स्वस्त झाली आहे
याशिवाय, जर आपण चांदीच्या किमतींबद्दल बोललो, तर 20 फेब्रुवारी रोजी चांदीचा भाव 65,712 रुपये प्रति किलोच्या पातळीवर होता. दुसरीकडे, 25 फेब्रुवारी रोजी चांदीचा भाव 64,331 रुपये प्रति किलो होता, त्यानुसार, चांदीच्या दरात 1,381 रुपयांची घट झाली आहे.
जळगाव सुवर्णनगरीतील दर
जळगाव सराफ बाजारात सध्या सोने 55,900 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात आहे. तर चांदीचा एक किलोचा दर 66000 रुपये इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
सोने खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.