महाराष्ट्रहवामान
शेतकऱ्यांचे टेंशन वाढणार : यंदा पाऊस कमी पडणार?
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२३ । एकीकडे राज्यात मागच्या 5 वर्षांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने कुठेही दुष्काळाची परिस्थिती दिसून आली नव्हती.मात्र आता एक वाईट बातमी समोर आली आहे. ती म्हणजे यंदा क्षमतेपेक्षा पाऊस कमी होणार असल्याचे हवामान तज्ञानी शक्यता व्यक्त केली आहे.
पुढील तीन महिने म्हणजे 15 फेब्रुवारी ते 15 एप्रिलदरम्यान एनसो-न्यूट्रल स्थिती राहण्याची शक्यता आहे. अमेरिकन संस्था नॅशनल ओशिनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार, मे ते जुलैदरम्यान ‘अल-नीनो’ची स्थिती राहू शकते.
जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळ्याचा असतो. तज्ज्ञांनुसार, अल-नीनो वर्षांमध्ये दुष्काळाची शक्यता 60 टक्के, सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता 30 टक्के व केवळ 10 टक्के सरासरी पावसाची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.