⁠ 
शनिवार, मे 18, 2024

सावदा येथील लसीकरण केंद्रास रोहिणी खडसे यांची भेट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ । सावदा येथील अं.ग.हायस्कुल मध्ये सुरू असलेल्या कोरोना लसीकरण केंद्राला जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर यांनी भेट दिली. यावेळी रोहिणीताई खडसे यांनी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यासंबंधात जिल्हाधिकारी,जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, यांचे समवेत दूरध्वनी वरून  लसींचा पुरवठा वाढविण्या संदर्भात आणि लसीकरणासाठी आणखी एक खिडकी उघडण्यासंबंधी चर्चा केली जेणेकरून लसीकरणाचा वेग वाढेल.

यावेळी नगराध्यक्षा अनिता ताई येवले, उपनगराध्यक्ष विश्वास भाऊ चौधरी, अतुलभाऊ नेहते, मुरादजी तडवी, सय्यदजी असगर , पंकज भाऊ येवले,माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर पाटील, बंटी बढे सर  उपस्थित होते.

दरम्यान येथील लसीकरण केन्द्रावर आज कोव्हॅसीनचा दूसरा डोस उपलब्ध होणार असल्याने सकाळ पासून अनेक नागरिक येथे रंगा लाऊन उभे होते मात्र येथे फक्त 100 डोस आले असल्याने व जवळपास 2000 लोकांना येथे कोव्हॅसीन च्या  दुसऱ्या डोस ची अत्यावश्यक असल्याने येथे प्रचंड गोंधळ दिसून आला अनेकांना सकाळी कूपन मिळाले नाही त्यामुळे ते संतप्त झाले व येथे काही वेळ गोंधळ निर्माण झाला यातच अनेक वयोवृद्ध नागरिकांची मात्र चांगलीच हेळसांड होत होती. दरम्यान रोहिणीताई खडसे यानी येथे आवश्यक असलेल्या कोव्हॅसीन साठी आणखी प्रयत्न करू यासाठी जळगाव येथे जिल्हारुग्णालयाचे डॉक्टर तसेच जिल्हाधिकारी यांचेशी संपर्क साधुन प्रयत्न करू असे सांगितले.

तसेच नागरिकांना येथे लस घेण्यासाठी आल्यावर बसन्याची तसेच उन्हा पासून बचाव व पिण्याचे पाणी यासारख्या सुविधा उप्लब्धते बाबत देखील पहानी केली तर अनेक नागरिकांनी रोहिणीताई यांचेशी संपर्क साधुन येथील अपूर्ण लस साठा, तसेच इतर समस्या व गोंधळा बाबत लक्ष वेधले यावेळी त्यांनी सर्वाच्या समस्या ऐकून त्या सोडऊ असे सांगितले तसेच सर्वाना लस मिळेल यासाठी प्रयत्न करीत आहो मात्र गोंधळ करू नका अशी देखील विनंती केली तसेच सोशल डिस्टनसिंग चे नागरिकांनी पालन करावे असे आवाहन केले,