दुर्दैवी : भरधाव कारने मेंढ्यांचा कळप चिरडला; 12 ते 15 मेंढ्यांचा मृत्यू

फेब्रुवारी 13, 2023 11:49 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२३ । नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पाचले गावाजवळ बाळूमामाच्या मेंढ्यांचा कळप भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कारने चिरडल्याची घटना घडली. यामध्ये सुमारे 12 ते 15 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. कळपातील काही मेंढ्या जखमी झाल्या आहेत.

goat jpg webp

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास बाळूमामाच्या मेंढ्यांसह तेरा क्रमांकाची पालखी सिन्नर येथील मिरगाव येथे मुक्कामी होती. या पालखीसह सुमारे 250 मेंढ्यांचा कळप पाचले शिवारातील रस्त्याच्या कडेला असलेल्या शेताकडे जात होता.

शिंदेवाडी फाट्यावरून शहा यांच्या बाजूने पाचळेकडे जाणाऱ्या भरधाव वेगात असलेल्या स्विफ्ट कारने थेट कळपावर धडक दिली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 12 ते 15 मेंढ्या ठार तर काही जखमी झाल्या. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत रास्ता रोको केला. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृत मेंढ्यांवर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. जखमी मेंढ्यांवर खासगी पशुवैद्यकाच्या मदतीने उपचार करण्यात आले आहेत. या भीषण अपघातात 12 ते 15 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now