---Advertisement---
जळगाव जिल्हा

जिल्हा बँकेचा अध्यक्ष होणार कोण?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी नुकताच बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याकडे दिला. तसेच बँकेचे उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला. यामुळे पुढे काय ? अशी चर्चा रंगू लागली आहे. (jdcc bank new precident)

अधिक माहिती अशी कि, गुलाबराव देवकरांनी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढील अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी लॉबींग सुरु झाले आहे.पर्यायी शेवटच्या क्षणी उमेदवार ठरण्याचीच शक्यता वर्तवली जात आहे.

ठरल्या प्रमाणे अध्यक्षपद हे राष्ट्र्रवादीकडे राहणार असून शिवसेनेकडे उपाध्यक्ष पद असणार आहे. अध्यक्षपदासाठी माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, संजय पवार आणि अॅड. रवींद्र पाटील या तिघांची नावे चर्चेत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार आमदार एकनाथ खडसे यांना दिले आहेत. त्यामुळे आमदार खडसे या तिघांपैकी कुणाच्या नावाची शिफारस करणार की दुसऱ्याच नावावर शिक्कामोर्तब करणार? याबाबत पक्षात उत्सुकता आहे.

JDCC Bank Jalgaon jpg webp

शिवसेनेच्या शिंदे गटाकडून उपाध्यक्ष पदासाठी पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील हे प्रताप हरी पाटील यांच्यासाठी आग्रही आहेत.तर गेल्यावर्षी उपाध्यक्ष पदासाठी प्रबर दावेदारी केलेल्या अमोल पाटील यांच्यासाठी पारोळ्याचे आमदार चिमणबाबा पाटील हे आग्रही असू शकतात असेही म्हटले जात आहे. जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री महाजन या उद्धव ठाकरे गटात राहिल्याने संचालकांच्या संख्येने अधिक असल्याने शिंदे गटाकडून त्यांना संधी मिळणे कठीण आहे. शिंदे गटातील कोणाला संधी द्यायची याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील महत्त्वाचा कौल मांडणार आहेत

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---