⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | राष्ट्रीय | भूकंपात ५६० जणांचा मृत्यू; भारत धावला मदतीला

भूकंपात ५६० जणांचा मृत्यू; भारत धावला मदतीला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | ६ फेब्रुवारी २०२३ | तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी झालेल्या भूकंपामुळे प्रचंड हाहाकार उडाला. ७.८ रिश्टर स्केलवर भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की दोन्ही देशांतील शेकडो इमारती कोसळल्या. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत ५६० लोकांचा मृत्यू झाला आहे तर १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. भूकंपामुळे झालेल्या नुकसानीबद्दल पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. भूकंपग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन भारताने दिले आहे.

तुर्कीमध्ये स्थानिक वेळेनुसार, पहाटे ०४:१७ वाजता भूकंप झाला. ७.८ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर ७.५ रिश्टर स्केलचा दुसरा मोठा भूकंप झाला. दोन्ही भूकंपांनी तुर्कस्तान आणि सीरिया किमान सहा वेळा हादरले. सर्वात मोठा धक्का ४० सेकंद जाणवला. यामुळे सर्वाधिक विध्वंसही झाला. तुर्कीच्या आपत्ती आणि आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेने सांगितले की, तुर्कीच्या ७ प्रांतांमध्ये २८४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ४४० जण जखमी झाले आहेत. सीरियातील मृतांची संख्या २३७ वर पोहोचली आहे. तर ६३० जण जखमी झाले आहेत. सीरियातील अलेप्पो आणि हमा शहरांमध्ये इमारतींना सर्वाधिक फटका बसला आहे.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.