जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२३ । सरकारी काम आणि चार महिने थांब अशी सर्वसाधारण धारणा जनतेची झालेली आहे. मात्र या धारणेला छेद देत आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून चाळीसगाव तालुक्यात “आमदार आपल्या दारी” उपक्रमाच्या माध्यमातून विविध शासकिय योजनांचा लाभ जनतेला देण्यात येत आहे. चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडे येथील आदिवासी भिल्ल वस्तीत वीज कनेक्शन नसल्याने अनेक कुटुंबांना अंधारात आपले जीवन जगावे लागत होते.
या सर्व कुटुंबाना हक्काचे वीज कनेक्शन तेदेखील कुठलीही कागदपत्रे फिरवाफिरव न करता तात्काळ मिळावे यासाठी “आमदार आपल्या दारी” उपक्रमांतर्गत वीज वितरण कंपनीच्या सहकार्याने नवीन वीज कनेक्शन जोडणी शिबीर मुंदखेडे बु. येथे राबविण्यात आले. सदर शिबिरात एकाच दिवसात पूर्ण कागदपत्रे पडताळणी करून २३ ग्राहकांना वीज कोटेशन देण्यात आले व त्याच दिवशी पात्र लाभार्थ्यांना वीज कनेक्शन देखील जोडून देण्यात आले.
ज्या कामासाठी एक महिना लागू शकणार होता ते काम आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून एकाच दिवसात झाल्याने व एका दिवसापुर्वी अंधारात असणारी आपली घरे प्रकाशमान झाल्याने मुंदखेडे येथील २३ कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य निर्माण झाले.
सदर शिबिरात आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कार्यालयामार्फत ५० ई श्रम कार्ड, ९ नवीन रेशन कार्ड साठी अर्ज भरून घेतले गेले तसेच इतर योजनांची माहिती देखील दिली गेली…
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती संजय तात्या पाटील, शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण, वीज वितरण कंपनीचे अभियंता शेळके साहेब, मुंदखेडा बु.येथील ग्रामपंचायत सरपंच सुनीताबाई पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील व सदस्य रमेश पाटील, बाबूलाल गायकवाड, विजय पाटील, बळीराम पाटील, ग्रामसेवक मगर मॅडम व गावातील नागरिक पवन पाटील, राकेश पाटील, भाऊसाहेब पाटील, भागवत गायकवाड, आत्माराम गायकवाड, नथु बोरसे, आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयाचे स्वयंसेवक आदी उपस्थित होते.