पसार आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

जानेवारी 27, 2023 3:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । 26 जानेवारी 2023। एक लाख 15 हजारांच्या रोकडसह मोबाईल व टॅबलेट लूट प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी एक वर्षानंतर अटक करण्यात मआयडीसी पोलिसांना यश आले आहे. सागर आकाश दहेकर (19, कंजरवाडा, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

crime 1 1 jpg webp

वर्षभरानंतर आरोपी जाळ्यात
सुनील शेषराव पाढाळे (रा.सहयोगनगर, हिवरखेडा रोड, जामनेर, जि.जळगाव) हा तरुण 22 मार्च 2022 रोजी वराड ते विटनेर रस्त्याने जात असतांना त्याच्या ताब्यातील एक लाख 14 हजार 629 रुपये रोख, मोबाईल टॅब आणि मोबाईल असा ऐवज हिसकावून घेण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून सागर आकाश दहेकर हा पसार होता. आरोपी जळगाव शहरातील जाखनी नगर भागात आल्याची एमआयीडीसी पोलिसांना कळताच पथकाने आरोपीला अटक केली.

यांनी केली आरोपीला अटक
एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी आदींनी आरोपीला अटक केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now