⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

दिलासादायक : जळगावचा पॉझिटिव्हीटी रेट राज्यात सर्वात कमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ मे २०२१ । जळगाव जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहे. कारण जिल्ह्यातील नव्या रुग्णांची संख्या हळूहळू कमी होताना दिसत असून पॉझिटिव्हिटी रेटही खाली येत आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ८.८९ टक्क्यांवर आला असून राज्यात सर्वात कमी जळगावचा पॉझिटिव्हिटी रेट आहे.

मार्च महिन्यात देशभरात रुग्णवाढीत ‘टॉप टेन’मध्ये असलेल्या जळगाव जिल्ह्यात आता दोन आठवड्यांपासून रुग्णवाढ स्थिर झाली आहे. बरे होणारे रुग्णही वाढू लागल्याने सक्रिय रुग्ण कमी होत आहेत. ही जळगावकरांसाठी दिलासादायक बाब आहे.

दुसरीकडे खानदेशात नंदुरबार जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटीमध्ये अव्वल क्रमांक कायम असून, उत्तर महाराष्ट्रात नगरची स्थिती अजूनही बिकट आहे. नगरचा पॉझिटिव्हिटी दर राज्यात पहिल्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागातर्फे शुक्रवारी ३० एप्रिल ते ५ मे या आठवड्यभराचा राज्याचा जिल्हानिहाय अहवाल जाहीर झांला. यात दहाच्या आत ८.८९ टक्के पॉझिटिव्हिटी रेट असणारा जळगाव जिल्हा एकंमेव आहे. उर्वरित सर्व जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट हा १० पेक्षा अधिक आहे.  २९ एप्रिल ते ५ मे या आठवड्यात जिल्ह्यात ५९ हजार ६० चाचण्या करण्यात आल्या. पैकी पाच हजार २४८ रुग्ण आढळून आले.

खानदेशातील नंदुरबार जिल्ह्यात आठवडाभरात ११ हजार ८५० चाचण्यांमधून एक हजार ७२९ (१४.५९ टक्के), धुळे जिल्ह्यात १३ हजार ९२४ चाचण्यांमधून एक हजार ५७४ (११.३० टक्के) रुग्ण समोर आलेत. तर उत्तर महाराष्ट्रात नगर जिल्ह्याची साप्ताहिक पॉझिटिव्हिटी तब्बल ४१.५२ टक्के आहे.