जळगाव शहरमहाराष्ट्रराजकारण
मोठी बातमी : सुधीर तांबे असणार काँग्रेसचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार
जळगाव लाईव्ह न्यूज | १० जानेवारी २०२३ | नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. सुधीर तांबे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. ते मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून तांबेच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
सत्यजित तांबे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. त्यामुळे काँग्रेसमध्ये उमदेवारी जाहीर करण्यावर पेच निर्माण झाला होता. तसेच भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती. काँग्रेसला दे धक्का देण्यासाठी भाजपने तयारी केली होती. मात्र, काँग्रेसने जोरदार सूत्र हलवित तांबे यांच्या घरात उमेदवारी राहिल याची काळजी घेतली. दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.