⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | महाराष्ट्र | फडणवीसांच्या मध्यस्तीमुळे महावितरणचा संप काही तासातच संपला

फडणवीसांच्या मध्यस्तीमुळे महावितरणचा संप काही तासातच संपला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२। आज मध्यरात्रीपासून वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप त्यांकडून मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्तीने हा संप मागे घेण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि कामगार संघटनांमध्ये आज चर्चा झाली. हि चर्चा सकारात्मक झाली. पर्यायी यावेळी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. हा राज्याच्या नागरिकांच्या दृष्टीने खूप मोठा दिलासा आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा विभागाचे अधिकारी, महावितरण, महानिर्मिती, महापारेषण विभागाचे अधिकारी आणि विविध वीज कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सह्याद्री अतिथीगृहात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बैठक झाली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित करताना म्हटले की, राज्य सरकारला वीज कंपन्यांचे कोणतेही खासगीकरण करायचे नाही. येत्या तीन वर्षात राज्य सरकार 50 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.

अदानी समूहाने समांतर परवान्यासाठी अर्ज केला. त्याच्या निषेधार्थ हा संप करण्यात आला होता. याबाबत बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, समांतर परवान्याबाबत महावितरण, सरकारने अर्ज वीज नियामक आयोगाकडे करायला हवे अशी भूमिका वीज कर्मचारी संघटनांनी मांडली होती. राज्य वीज नियामक आयोगाकडे आपल्या हिताचे निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका सरकार घेईल, असे फडणवीस यांनी म्हटले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह