जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ मे २०२१ । जळगाव शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून आता तर चक्क पोलीस पोलीस कॉन्स्टेबलची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही घटना जिल्हापेठ हद्दीतील मानियार होलसेल दुकानासमोर घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, गेल्या काही महिन्यापासून शहरातून दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढताच आहे. पोलीस कर्मचारी विजय नवल अहिरे (वय-३१) हे बुधवार ४ मे रोजी ११ वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने जिल्हापेठ हद्दीतील मणियार होलसेल दुकानाजवळ दुचाकीने आले. दुकानासमोर (एमएच १९ सीकी ४०४५) क्रमांकाची दुचाकी पार्किंगला लावून ते कामानिमित्त निघून गेले. १५ मिनिटानंतर काम आटोपून ते दुचाकीजवळ आले असता दुचाकी जागेवर मिळून आली नाही. पोलीस कॉन्स्टेबल विजय अहिरे यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक करीत आहे.
दरम्यान, जळगाव शहरामधील दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीची वातावरण पसरले आहे.