⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 11, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | पाण्यात करंट उतरवून वन्यप्राण्यांच्या शिकारीचा प्रयत्न; सहा जणांना अटक

पाण्यात करंट उतरवून वन्यप्राण्यांच्या शिकारीचा प्रयत्न; सहा जणांना अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल तालुक्यातील सातपुडाच्या जंगलात केबल व सेंट्रिंग तारच्या सहाय्याने नाल्यात तसेच पाणी असलेल्या ठिकाणी करंट उतरवून वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ६ जणांना वनविभागाकडून नुकतीच अटक करण्यात आली आहे. त्या सहाही जणांकडून शिकारीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

यावल तालुक्यातील सातपुडा वनक्षेत्राच्या कक्ष क्र. ८१ (वड्री खु.) मध्ये शनिवार दि.२७ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास वन विभागाचे पथक गस्त करीत असतांना असराबारी पाडा या अदिवासी वस्तीवरील विद्युत खांब्यावरून केबल व लोखंडी सेंट्रिंग तार २४० मिटर लांब झाडांमधून पड्री धरणाकडे येणाऱ्या नाल्यात तसेच आणि असलेल्या ठिकाणापर्यत पसरविलेले व वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने लावलेले चालू विज कनेक्शन आढळून आले होते. याप्रकरणी वनविभागाने रविवार दि.२८ रोजी कारवाई करून लावण्या कालु बारेला, राकेश रविद्र चौधरी, नान्हु धनसिंग पावरा, किरण वारासिंग बारेला, रमेश तारासिंग बारेला व लालासिंग रेवा बारेला (सर्व रा. आसाराबारी पाडा, वड्री खु.) यांना संशयितांना अटक केली.

अन पथक बालंबाल बचावले
वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व, वनपाल डोंगरकठोरा, वनरक्षक वड्री, मोहमांडली उत्तर, हरिपूरा, निंबादेवी पश्चिम, अंबापाणी आदींचे पथक गस्तीवर असतांना या पथकाला शिकारीसाठी पसरविण्यात आलेले विद्युत कनेक्शन वेळीच लक्षात आले. त्यामुळे पथकातील कर्मचारी विद्युत वाहिनीचा शॉक लागण्यापासून थोडक्यात बचावले. पुढील तपास व कार्यवाही सहाय्यक वनसरंक्षक विक्रम पदमोर हे करीत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.