लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका होणार; भाजप केंद्रीय मंत्र्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

डिसेंबर 27, 2022 10:30 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२२ । औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात नवनिर्वाचित भाजप सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार आयोजित करण्यात आला आला होता. यावेळी भाजपचे (BJP) नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे. राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या देखील निवडणुका होणार असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

election jpg webp

यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले की, हल्लीची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. सोबतच राजकीय घडामोडी होऊन इतर औरंगाबाद जिल्ह्यातील इतर पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावाही दानवे यांनी यावेळी केला आहे. दानवे यांचे या विधानाने राजकीय वर्तुळात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या अनेक दिवसांपासून मध्याविधी निवडणूक लागण्याच्या चर्चा सुरू असतानाच दानवे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दानवेंची फटकेबाजी…

फुलंब्री येथे आयोजित करण्यात आलेल्या नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी जोरदार फटकेबाजी केली. आपल्या राजकीय करियर बद्दल बोलताना दानवेंनी अनेक किस्से सांगितले. मात्र, याच वेळी गावातील राजकारण याबद्दल नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना अनेक सल्लेही दिले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now