शेंदुर्णीच्या शेतकऱ्यानं उचलले टोकाचे पाऊल, विष प्राषण करून केली आत्महत्या
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२२ । शेंदुर्णी येथील ४८ वर्षीय शेतकऱ्यानं कर्ज बाजारीपणाला कंटाळुन विष प्राषण करून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दि.१९ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकणी पोलिसांत नोंद करण्यात आली कि, नाही हे कळू शकले नाही.
ज्ञानेश्वर विठ्ठल गायकवाड (४८) आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. सूत्रानुसार, गायकवाड यांनी आपल्या शेतातील नापिकी, अल्प उत्पन्न, शेतातील पिकांची दयनीय अवस्था व वाढलेल्या कर्जाच्या बोजाला कंटाळुन शनिवारी दि.१९ नोव्हेंबर रोजी आपल्या शेतातच विष प्राषण केले. त्यानंतर उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
ज्ञानेश्वर विठ्ठल गायकवाड हे अडीच एकर कोरडवाहु शेतात ते मेहनत करुन संसाराचा गाडा हाकत होते. त्यांच्या पश्चात वयोवृध्द आई वडील, पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी आहे.