धक्कादायक : भुसावळात विद्यार्थ्यावर चाकू हल्ला, गुन्हा दाखल

नोव्हेंबर 21, 2022 10:06 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२२ । भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील हिमालय पेट्रोल पंपाजवळ आदित्य सावकारे या विद्यार्थ्यावर शुक्रवार, १८ नोव्हेंबर रोजी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 23 jpg webp

वादातून केला चाकू हल्ला
नाहाटा कॉलेजमध्ये एक महिन्यापूर्वी विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला होता. एकमेकांकडे खुन्नसने पहातो म्हणून आपसात वाद होत होते. या वादाचे रूपांतर शुक्रवारी थेट चाकू हल्ल्यात झाले. हिमालय पेट्रोल पंपाजवळ आदित्य कैलास सावकारे (१७) या विद्यार्थ्यावर चाकूने सपासप वार करण्यात आल्याने तो जबर जखमी झाला होता. त्याच्यावर ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार केल्यानंतर त्यास खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात शनिवारी दुपारी तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

तीनही संशयीत अल्पवयीन
चाकू हल्ला करणारे तीनही संशयीत हे अल्पवयीन असल्याचे निरीक्षक राहुल गायकवाड म्हणाले. या प्रकरणात अनेकांची चौकशी करण्यात आली आहे, अजूनही काही जणांना चौकशीकामी बोलाविले जाणार आहे. शिक्षण घेण्याच्या वयात हातात चाकू घेणार्‍यांची दादागिरी शहरात खपवून घेतली जाणार नाही असे निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले. या प्रकारामुळे महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कायदा सर्वांंना सारखाच आहे, कायद्यात रहाल तर फायद्यात राहाल, शिक्षण घेण्याच्या वयात गुन्हेगारी क्षेत्राकडे वळू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now