जळगाव शहर

क्रिकेट खेळाडूंना मिळाला दिलासा : सागर पार्क मैदानाचे भाडे झाले स्वस्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज| १८ नोव्हेंबर २०२२ | जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर नेहमीच क्रिकेटचे सामने भरवले जातात. हे क्रिकेटचे सामने भरण्यासाठी प्रतिदिन तीस हजार रुपये इतके भाडे महानगरपालिकेने ठरवले होते मात्र आता यात कपात करण्यात आली असून प्रतिदिन पाच हजार रुपये इतके भाडे संबंधित सामना आयोजकांना भरावे लागणार आहे.

जळगाव शहर महानगरपालिकेच्या सतराव्या माळ्यावर महापौर दालनात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, नगरसेवक येथील नितीन लढ्ढा, कैलास सोनवणे, सुचिता हाडा, नितीन बर्डे, बंटी जोशी व इतर मनपा अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी या धोरणावर निर्णय घेण्यात आला.

यावेळी सागर पार्क येथे क्रिकेट स्पर्धेवेळी डीजे चा उपयोग करू नये असे ठरविण्यात आले आहे. याच बरोबर आवाज कमी असावा असेही सांगण्यात आले आहे.. हा प्रस्ताव लवकरच महासभेच्या पटलावर ठेवण्यात येणार असून महासभा याला मान्यता देणार आहे.

Related Articles

Back to top button