जळगाव शहरमहाराष्ट्रविशेष

VIRAL POST : एक खड्डा किती जणांना पोसतो हे तुम्हाला माहिती आहे का ?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२२ । जळगाव शहरात खूप खड्डे झाले आहेत. मात्र या खडयांचे महत्व तुम्हाला माहित आहे का ? किंबहुना रस्त्यावरील एक खड्डा किती जणांना पोसतो माहिती का? नाही ना तर सध्या एक पोस्ट संपूर्ण जळगाव शहरात व्हायरल होत आहे. पोस्ट प्रमाणे खड्यांचे तब्बल ५०हुन अधिक फायदे आहेत. एक खड्डा ५० जणांना पोसतो असे यात म्हटले आहे. वाचा काय आहे व्हायरल पोस्ट

एक खड्डा किती जणांना पोसतो हे तुम्हाला माहिती आहे का?

काँट्रॅक्टर

सिमेंट, खडी, डांबर विक्रेते

सिमेंट, खडी, डांबर कंपन्या, अन उपसा करणारे

याची वाहतूक करणारे

खड्डे बुजवणारे कामगार

खड्यात पडून लागले तर डॉक्टर

जास्त लागले तर टाके घालणारा डॉक्टर

जोरात गचका बसला तर मणक्याचे डॉक्टर

हात पाय तुटले तर अम्ब्युलन्स आणि ड्रायवर

अम्ब्युलन्स मध्ये स्ट्रेचर बनवणारे

स्ट्रेचर बनवण्यासाठी लागणारे लोखंड विक्रेते, कापड / रबर विक्रेते

ते बनवणारे फेब्रिकेटर

मग ICU असणारे दवाखाने

तिथे काम करणारा वर्ग

औषधे, सलाईन, त्याची सुई बनवणारे, मार्केटिंग करणारे

औषध विक्रेते

हेल्मेट नसेल आणि जर डोके फुटले तर

(वरील 10-16 नंबर्स आहेतच शिवाय)

मेंदू सर्जन

ऑपरेशन साठी सुर्या, कात्र्या बनवणारे

जर धडाधड गाडी गेली खड्ड्यातून तर टायर विक्रेते

शॉकअबसरवर बनवणारे

फिटर

इथे सगळीकडे काम करणारे

या सगळ्याचा पार्टस बनवणारे

या सगळ्यांना जागा भाड्याने देणारे

त्या भाड्या साठी ते बांधून देणारे बिल्डर्स

त्या बिल्डरला लागणारे सगळे सामान पुरवणारे

बिल्डिंग काँट्रॅक्टर्स

काँट्रॅक्टर्स कडे काम करणारे कामगार

त्यासाठी लागणारी वाहतूक

त्या वाहतुकीसाठी लागणारे डिझेल विक्रेते

तिथे काम करणारे कामगार

तो पेट्रोल पंप बांधणारे

मग ते मटेरियल सप्लाय आणि विक्रेते

त्या खड्ड्यावरून राजकारण करणारे पक्षाधारी आणि विरोधी पक्ष नेते

त्या नेत्यांच्या बाजूला आरोळ्या ठोकायला लागणारे कार्यकर्ते

त्यांच्या हातात असलेले बॅनर प्रिंट करणारी दुकाने

प्रिंटर वाले, त्याची शाई बनवनरे आणि विकणारे

त्या बॅनर ला लागणाऱ्या काठ्या पुरवणारे

त्या सगळ्या कार्यकर्तेयांना लागणाऱ्या गाड्या (दोघात किंवा तिघात एक) मग त्याचे पेट्रोल

त्या गाड्या बनवणारे

त्या गाड्या खड्ड्यातून गेल्यावर त्याचे स्पेअर पार्टस परत ढिल्या होणार ते बनवणारे आणि फिटर्स

समजा माणूस गचकलाच तर वरील सर्व

तिरडी वाले

गुरुजी

हार पुष्पवाले

त्यांच्याकडे येणार्याना लागणारे पेट्रोल

परत खड्ड्यातून जाणारे त्यांचे टायर्स आणि ढिले होणारे पार्टस

आणि अजून डायरेक्ट अथवा इंदायरेक्ट अनेक असतात
हे असे आर्थिक चक्र आहे,
उघडा डोळे बघा नीट

“तुम्हाला ना माझी किंमतच नाही” – एक खड्डा

Related Articles

Back to top button