⁠ 
रविवार, मे 19, 2024

‘दैनंदिन जीवनातील गीता’ या विषयावर जळगावात प्रवचनाचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२२ । विविध सामाजिक उपक्रम राबविणार्‍या केशवस्मृती सेवासंस्था समूहातर्फे 18 ते 20 नोव्हेंबर 2022 दरम्यान ‘दैनंदिन जीवनातील गीता’ या विषयावर प.पू. डॉ.शंकरजी अभ्यंकर यांच्या जाहीर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. नामवंत प्रवचनकार व्याख्याते अखिल भारतीय संत विद्यापीठाचे प्रवर्तक, आदित्य प्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक आणि महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकार, कीर्तनकार आणि व्याख्याते विद्यावाचस्पती गुरुदेव परमपूज्य डॉ. शंकरजी अभ्यंकर यांच्या ‘दैनंदिन जीवनातील गीता’ हे प्रवचन जळगावकरांसाठी तीन दिवस एक आध्यात्मिक मेजवाणी ठरणार आहे.

जळगाव जनता सहकारी बँकेच्या प्रायोजकत्वाखाली तीन दिवसीय प्रवचने शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात सायंकाळी 6 ते रात्री 8 या वेळात होतील. यात विद्यावाचस्पती डॉ.शंकरजी अभ्यंकर हे आपल्याला दैनंदिन जीवनात गीतेचे महत्त्व यावर अमुल्य असे प्रबोधन करतील.

सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी मार्गदर्शक असणार्‍या भगवद्गीतेवर डॉ. शंकरजी अभ्यंकर यांनी देशभर असंख्य प्रवचने दिली आहेत. त्यांच्या रसाळ, ओघवत्या वाणीतून गीतेवरील हे भाष्य श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे ठरते. अशा या महनीय व्यक्तीच्या प्रवचनास श्रोत्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन केशवस्मृती सेवासंस्था समूहातर्फे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विनामुल्य असून सर्वांना प्रवेश असेल. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका जळगाव जनता सहकारी बँकेच्या नवीपेठ, गणेश कॉलनी व ओंकारेश्वर या शाखांमध्ये श्रोत्यांना उपलब्ध होतील.