जळगाव जिल्हा

एकनाथ शिंदेंच्या गडात ठाकरे गटाची एंट्री.. अन झाला तुफान राडा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२२ । ठाण्यातील किसन नगरमध्ये शिवसेनेच्या नव्या शाखेचं उद्घाटन होत. यावेळी शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने आले. शिंदे गटाच्या कार्यकत्यांकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

संबंधित प्रकार कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. विशेष म्हणजे या मारहाणीवेळी खासदार राजन विचारे हे देखील घटनास्थळी होते. किसन नगरमध्ये ठाकरे गटाकडून मेळावा घेण्यात येत होता. यावेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते योगेश जानकर यांच्याकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतो आहे. किसन नगर परिसर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो.

या परिसरात ठाकरे गटाकडून कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे देखील कार्यक्रमाला आले होते. त्यांच्यासोबत किसन नगरमधील ठाकरे गटाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. ठाकरे गटाचा कार्यक्रम सुरु असताना संबंधित परिसरात शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक दाखल झाले. त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला. या दरम्यान दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. या कार्यकत्यांनी सुरुवातीला एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीचं रुपांतर मारहाणीत झालं.

Related Articles

Back to top button