बातम्या

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयासाठी प्रशासकीय मान्यताच नाही

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२२ । पिंप्राळ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळालेली नाही, तरी देखील लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव दि.२४ ऑगस्ट रोजी आपण दरपत्रक मागविण्याची निविदा मागवलेली आहे. त्यामुळे मनपा पदाधिकाऱ्यांनी केलेला आरोप चुकीचा असून जनतेची दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्टीकरण शहर अभियंता एम.जी.गिरगावकर यांनी केले आहे.

महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास शहर अभियंता विलंब करीत असल्याचा आरोप महापौर, उपमहापौर यांच्यासह विविध संघटनांनी केला होता. तसेच शहर अभियंता गिरगावकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी उपस्थितांकडून करण्यात आली होती. त्यावर शहर अभियंता गिरगावकर यांनी खुलासा केला आहे. शहर अभियंता गिरगावकर यांनी सांगितले की, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव दि.२३ मार्च २०२२ रोजी महासभेत मंजुर झाला. त्यानंतर शहर अभियंता गिरगावकर रुजू झाल्यानंतर त्यांनी दि.१६ जुन २०२२ रोजी प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया सुरु केली. पुतळा उभारण्यासाठी सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आलेली नव्हती त्यामुळे अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळालेली नाही. तरी देखील लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव आणि जनतेच्या भावना लक्षात घेऊन स्वत: रिस्क घेत दि.२४ ऑगस्ट २०२२ रोजी दरपत्रक मागविण्याची निविदा आपण मागवली, त्यामुळे शिवस्मारकाला विलंब करण्याचा प्रश्नच येत नाही. उलट लोकप्रतिनिधींच्या आग्रहामुळे आपल्याकडून प्रशासकीय व आर्थिक अनियमितता होत आहे. पण आपण मा.महासभेला क्षमापण देऊन कार्योत्तर मान्यता देण्यासाठी याची विनंती करणार आहोत, असे देखील शहर अभियंता गिरगावकर यांनी सांगितले.

तसेच दि.११ रोजी महापौर यांच्या दालनात समिती गठीत करुन क्ले मॉडेल पैकी सुयोग्य क्ले मॉडेलची निवड करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते परंतु काही कारणास्त ही बैठक रद्द झाली असून ती बैठक दि.१४ रोजी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button