⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या सल्लागार समिती अध्यक्षपदी अशोक जैन यांची निवड

महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या सल्लागार समिती अध्यक्षपदी अशोक जैन यांची निवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगावचे सिद्धार्थ मयूर कार्याध्यक्ष व फारुक शेख यांची उपाध्यक्ष पदी निवड

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२२ । महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा १२ नोव्हेंबर रोजी जैन हिल्स जळगाव येथे संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष व ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आमंत्रित व निरीक्षक म्हणून अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार समितीचे संचालक तथा महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष व जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची विशेष उपस्थिती होती.

व्यासपीठावर संघटनेचे उपाध्यक्ष पी.बी. भिलारे,विनय बेळे, खजिनदार फारुक शेख, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन यांची उपस्थिती होती. विशेष सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्यात आले. २०२३ च्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली तसेच आयत्या वेळेवरील विषयात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी व अखिल भारतीय स्पर्धेसाठी राज्य संघटनेतर्फे खेळाडूंसाठी विशेष अनुदान मंजूर करण्यात आले.

२०२२ ते २०२५ साठी कार्यकारणी निवड
२०२२ ते २०२५ या चार वर्षासाठी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने लेखी निवडणूक संचिका घोषित केली होती व त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातून अध्यक्ष, कार्याध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष तसेच ६ उपाध्यक्ष व ६ सहसचिव या पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. महाराष्ट्र राज्यातून १७ पदांसाठी फक्त १७ उमेदवार उभे राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्या सतरा पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड घोषित केली.

निवड झालेले पदाधिकारी
अध्यक्ष आमदार परिणय फुके (नागपूर), कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर (जळगाव), वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे (पुणे), सचिव निरंजन गोडबोले (पुणे), खजिनदार विलास म्हात्रे (रायगड), उपाध्यक्ष अभिजीत कुंटे (रायगड), गिरीश चितळे (सांगली), नरेंद्र फिरोदिया (अहमदनगर), गिरीश व्यास (नागपूर), विनय बेळे (नाशिक) व फारुक शेख (जळगाव),
सहसचिव अंकुश रक्ताडे (बुलढाणा), हेमेंद्र पटेल (औरंगाबाद), भरत चौगुले (कोल्हापूर), पी बी भिलारे (मुंबई), निनाद पेडणेकर(पालघर), श्रीराम खरे (रत्नागिरी).

नवीन पदाधिकाऱ्यांनी संघटनेला योगदान द्यावे – अशोक जैन
निवड घोषित झाल्यावर उपस्थित पदाधिकाऱ्यांना व राज्यातील संघटनांच्या सभासदांना अशोक जैन यांनी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेला अजून पुढे कसे नेता येईल यावर विचार विमर्श करावा, खेळाडूंच्या हितासाठी अहोरात्र प्रयत्न करावे, महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त खेळाडू ग्रँडमास्टर होतील याकडे लक्ष केंद्रित करावे, खेळाडूंच्या हितासाठी जैन इरिगेशन सदैव आपल्या पाठीशी आहे असे आश्वासन देऊन चेस इन स्कूल व बुद्धिबळाच्या विकासासाठी जैन इरिगेशनतर्फे 11 लाख रुपये देणगी स्वरूपात देत असल्याची घोषणा सुद्धा त्यांनी यावेळी केली.

सभेतील विषया संदर्भात व संघटनेच्या विविध कार्यकारणी समिती बाबत वरिष्ठ उपाध्यक्ष अभिजीत कुंटे यांनी मार्गदर्शन केले व लवकरच विविध समीत्या घोषित करण्यात येईल असे आश्वासित केले. सभेचे सूत्रसंचालन फारुक शेख यांनी तर आभार सहसचिव अंकुश यांनी मानले. सभेला राज्यातून ३२ जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.