बातम्या
कपाशीला मुद्दाम लावली आग : शेतकऱ्याचे मोठे नुकसान
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२२ । शेतकर्याने नफ्याने केलेल्या कपाशीला गावातीलच एकाने पेटती काडी टाकून आग लावल्याची धक्कादायक घटना गावाबाहेर बुधवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एकाविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
फैजपूर पोलिसात एकाविरोधात गुन्हा
दीपक श्रीराम कोळी (38, कोळीवाडा, भालोद) यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी नफ्याने केलेल्या शेतीतून दोन लाख 70 हजार रुपये किंमतीचे 30 क्विंटल कपाशी निघाल्यानंतर ही कपाशी जि.प.शाळेसमोरील पटांगणावर वाळवण्यासाठी टाकल्यानंतर संशयीत आरोपी निलेश दिलीप पाटील (भालोद) याने कुठल्यातरी कारणातून कपाशीला पेटती काडी टाकून आग लावल्याने नुकसान झाले. या प्रकरणी निलेश पाटील विरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार गोकुळ बुधा तायडे करीत आहेत.