सावरकरही तुरुंगात असताना एकांतात होते – खा. संजय राऊत
जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२२ । मी एकांतात होतो. वीर सावरकरही तुरुंगात असताना एकांतात होते. लोकमान्य टिळक देखील तुरुंगात होते. माझी अटक देशील राजकीय होती आणि मी माझा एकांतातला काळ सत्कर्मी लावला आहे. असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.
आधीक माहिती अशी कि, काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संजय राऊतांवर टीका केली होती. त्या वेळी ते म्हणाले होते कि, “राऊतांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी” आज संजय राऊतांनी त्याच टीकेला प्रत्युत्तर दिले आहे
यावेळी संजय राऊत म्हणाले कि, “मनसे प्रमुख आणि माझे मित्र राज ठाकरे यांनी एका ठिकाणी बोलताना माझ्यावर टीका केली होती. संजय राऊतांवर आता ईडीने कारवाई सुरू केली आहे. त्यांनी आता एकांतात बोलण्याची सवय लाऊन घ्यावी, असे ते म्हणाले होते. मात्र, मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, की मी कारागृहात एकांतात होतो. वीर सावरकरही तुरुंगात असताना एकांतात होते. लोकमान्य टिळक तसेच आणीबाणीच्या काळात अनेक नेते एकांतात होते. तशीच माझी अटकही राजकीय होती आणि मी माझा एकांतातला काळ सत्कर्मी लावला आहे”, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले.