जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२२ । यावल तालुक्यातील किनगाव गावातून अज्ञात चोरट्यांनी मामाची दुचाकी भाच्याच्या घरासमोरून लांबवली. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.
घराबाहेरून लांबवली दुचाकी
किनगाव खुर्द येथील सरफराज युनूस पिंजारी (25) यांनी मामा शेख नईम शेख सलमी पिंजारी (आमोदा) यांची बजाज कंपनीची प्लॅटीना (एम.एच.19 ए.टी.8850) शेती कामानिमित्त घरी आणली होती. रविवार, 6 नोव्हेंबर रोजी ही दुचाकी घराबाहेर लावली असताना चोरट्यांनी संधी साधली. सोमवारी सकाळी सरफराज पिंजारी हे नेहमी प्रमाणे पाणी भरण्यास बाहेर आले असता दुचाकी चोरीचा प्रकार उघड झाला. पिंजारी यांनी तक्रार दिल्याने यावल पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.
सावदा शहरातून दुचाकी लांबवली
सावदा ः शहरातील खिरोदा रोडवरील कुलसूमबी मंगल कार्यालयासमोरील मोकळ्या जागेतून चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी सावदा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सुनील सुरेश सपकाळे (36, राजबाग, फैजपूर) यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी ज्युपिटर दुचाकी (एम.एच.19 डी.ए.4846) ही खिरोदा रोडवरील कुलसूमबी मंगल कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत लावली होती मात्र चोरट्यांनी संधी साधून गुरुवार, 3 रोजी दुपारी दोन ते आठ दरम्यान संधी साधून दुचाकी लांबवली. तपास एएसआय महेमूद शहा कादर करीत आहेत.