जळगाव शहर

रोटरेक्ट क्लब फक्त देशासाठी नव्हे तर जगासाठी विकास साध्य करू पाहत आहे!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२२ । मानव हा समाजाचा प्रमुख घटक आहे. सामाजिक विकास करणे ही त्याची प्राथमिक जबाबदारी असते. भारत हा तरुणाचा देश आहे. त्यामुळे तरुण भारत हा स्वच्छ आणि आरोग्य संपन्न असलाच पाहिजे. देशात विविध सामाजिक संस्था समाजाच्या विकासाकरिता तत्पर आहेत. परंतु रोटरेक्ट क्लब फक्त देशासाठी नाही तर जगासाठी विकास साध्य करू पाहत आहे तसेच हा क्लब देशातील विविध ग्रुप सोबत जुळत एक सकारात्मक चळवळ उभी करत आहे. तसेच आपण एक सामाजिक घटक म्हणून समाजाप्रती देनं लागतो याची जाणीव ठेवून प्रत्येकाने जगायला शिकले पाहिजे असे मत रोटरेक्टचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. आनंद झुनझुनवाला यांनी व्यक्त केले.

जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात रोटरॅक्ट क्लब ऑफ रायसोनी इलाईटतर्फे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. आनंद झुनझुनवाला, डॉ. पंकज शहा व निलेश झवर यांना आमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सांगितले की,”तुमच्या व्यक्तिगत विकासासाठी रोटरॅक्ट सारखा सोर्स फार महत्त्वाचा असतो. गेल्या अनेक वर्षांपासून मी ते अनुभव घेते आहे. तुमच्या सुप्त गुणांना जास्तीत जास्त वाव द्या. तुमच्या इच्छाशक्तीच्या बळावर तुम्ही कुठे पोहोचायचे हे तुम्हाला ठरवायचे आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यानंतर कार्यक्रमाचे दुसरे मार्गदर्शक डॉ. पंकज शहा यांनी  रोटरॅक्ट क्लब ऑफ रायसोनी इलाईटतर्फे केलेल्या कामाचा आढावा घेतला., पॅन्डॅमिक काळात आरोग्य सेवेला हातभार लावता आला, वेळ प्रसंगी मदतीला धावून जाता आले, याचे प्रचंड समाधान मिळाले असे नमूद केले.

या कार्यक्रमाचे समन्वय प्रा. श्रिया कोगटा यांनी साधले तर यावेळी रायसोनी रोटरेक्ट क्लबचे अध्यक्ष यश लड्ढा, सचिव लोकेश पारेख, आरटीएन नितीन इंगळे, आरटीएन अजित महाजन, सचिव आरटीएन नीलेश झावर, आरटीएन डॉ. गोविंद मंत्री, आरटीएन अभिशेक अलोन यांच्यासह प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा.डॉ. योगिता पाटील, प्रा. कल्याणी नेवे हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सांगता म्युझिक क्लबच्या सादरीकरणाने झाली. तसेच या कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले.

Related Articles

Back to top button