इतकी भिXXXX… सुप्रिया सुळेंबाबत बोलताना अब्दुल सत्तारांनी केली शिवीगाळ
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२२ । शिंदे गटाचे सदस्य तथा राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलगी खासदार सुप्रिया यांच्यावर टीका करताना अतिशय गलिच्छ वक्तव्य केलं. मंत्री सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत “इतकी भिकारXX झाली असेल त्यांनाही (खोके) देऊ”, असं म्हटलं. त्यांच्या या वक्तव्याने राज्यभरातील राजकीय वातावरण तापलं असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत.
राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अब्दुल सत्तार यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. औरंगाबादच्या सिल्लोड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा घेतला जात होता. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी सुप्रिया सुळे यांनी पन्नास खोके संदर्भात वापरलेल्या शब्दाबाबत विचारणा केली असता. केलेल्या आरोपाबाबत सत्तार यांच्याकडे विचारणा केली. सुळे यांच्या आरोपावर सत्तार यांनी संताप व्यक्त केला. संतापाच्या भरात सत्तार यांची सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना त्यांची जीभ घसरली.
नेमकं काय म्हणाले सत्तार??
“इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही (खोके) देऊ”, असं म्हटलं. यानंतर पुन्हा एकदा सत्तार यांनी “ते आम्हाला खोके बोलू लागले आहेत, आमचे खोके त्यांचे डोके तपासावे लागेल, ज्यांचे डोके तपासावे लागेल खोक्याची आठवण येऊ लागली आहे त्यांच्यासाठी सिल्लोडमध्ये दवाखाना उघडावा लागेल. त्या दवाखान्यात खोके खोके बोलतात त्यांचे डोके तपासावे लागले. हे भिकारXX लोक, राजकारणच भिकारी धंदा आहे. आम्ही दररोज लोकसभा, विधानसभेसाठी मतांची भीक मागतो”, असं अब्दुल सत्तार म्हणाले