---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे महाराष्ट्र

Accident : सेल्व्हास-जळगाव बसला जव्हारजवळ बसची धडक, २५ प्रवासी जखमी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२२ । सेल्व्हास-जळगाव बसला जव्हार जवळ बसची धडक झाल्याने २५ प्रवासी जखमी झाल्याचे समोर आले आहे. पालघर जिल्ह्यात हा मोठा अपघात झाला आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हारमध्ये दोन एसटी बसचा समोरासमोर भीषण अपघात झाल्याने 20 ते 25 प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

accident 23 jpg webp webp

जखमींना तातडीने जव्हार येथील पतंगशाहा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नाशिक – सिलवासा आणि जळगाव – सिलवासा या दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या आहेत.यामुळे हा अपघात झाला आहे. सकाळच्या सुमारास जव्हार – सिल्वासा मार्गावर असणाऱ्या जयसागर डॅमजवळ हा अपघात झाला आहे.

---Advertisement---


अपघात इतका भीषण होता की, दोन्ही एसटी बस अक्षरश: चिरडल्या गेल्या. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन्ही बसमधील 20 ते 25 प्रवासी जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं आहे. जखमींवर सध्या जव्हार येथील पतंगशाहा कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---