शरद पवार ब्रीच कॅंड रुग्णालयातून थेट शिर्डीत : पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२२ । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबईतील ब्रीच कॅंड रुग्णालयातून थेट शिर्डीत पक्षाच्या अधिवेशनाच्या व्यासपीठावर दाखल झाले. यावेळी सर्वांनी एकाच जल्लोष केला. आता ते शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
ज्येष्ठ नेते पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाच्या तोंडावर आजार पडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते शिबिराला येणार की नाही, याची चर्चा रंगली होती. मात्र, सर्वांचे अंदाज खोटे ठरवत पवार यांनी पक्षाच्या शिबिराच्या पहिल्याच दिवशी ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावली हेाती..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रीच कॅंडी रुग्णालयात जाऊन पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनीच शरद पवार हे आज शिर्डीत शिबिराला येऊन मार्गदर्शन करणार आहेत, असे सांगितले होते. त्यानुसार पवार आज शिर्डीतील व्यासपीठावर विराजमान झाले आहेत. पवार हे मुंबईहून थेट हेलिकॉप्टरने शिर्डीत दाखल झाले. विमानतळावरून ते शिबिरात थेट व्यासपीठावर दाखल झाले आहेत.