नाथाभाऊ हे सर्व जातीधर्माला न्याय देणारे नेतृत्व – रोहिणी खडसे
जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२२ । संपूर्ण मुक्ताईनगर मतदारसंघ हा नाथाभाऊंचा परिवार असून मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला त्यांनी कुटुंबातील व्यक्ती प्रमाणे वागणूक दिली आहे. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे काम मार्गी लावले कोण आपला कोण परका असा कोणताही भेदभाव केला नाही. सर्व जाती धर्मातील लोकांना राजकारणात पदे दिली. अगदी सामन्यातील सामान्य व्यक्तींना त्यांनी आमदार, खासदार, सभापती, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य सरपंच बनवले कार्यकर्त्यांसाठी जिवाचे रान केले असे प्रतिपादन रोहिणी खडसे यांनी जनसंवाद यात्रेत तांदलवाडी येथील कॉर्नर सभेत केले.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या नाथाभाऊ यांनी नेहमी विकासाचे राजकारण केले विकास कामे करताना त्यांनी कधी कोणताही भेदभाव केला नाही या परिसरातील प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिला. तांदलवाडीमधील बॅक वॉटर मध्ये बाधित घरांचे पुनर्वसन करण्यासाठी जागा निश्चित झाली असली तरी प्लॉट मिळत नसल्यामुळे बधितांनी जलसमाधी आंदोलन केले त्यावर नाथाभाऊ यांनी जिल्हाधिकारी यांच्या सोबत चर्चा करून आंदोलन स्थळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारदे तहसीलदार यांच्या सोबत भेट देऊन येत्या मार्च पर्यंत बाधित कुटुंबांना प्लॉट मिळण्याचा मार्ग मोकळा केला. तापी काठावरील अजून काही गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न आहे नाथाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही तो सोडविण्याचा प्रयत्न करू असे रोहिणी खडसे यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले. तसेच जास्तीत जास्त संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभासद होण्याचे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.
मतदारसंघातील जनतेशी संवाद साधण्यासाठी रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रवादी जनसंवाद यात्रा काढली आहे. यात्रेच्या सव्वीसाव्या दिवशी यात्रे दरम्यान रोहिणी खडसे यांनी रावेर तालुक्यातील सुनोदा,मांगलवाडी,तांदलवाडी येथील ग्रामस्थांसोबत संवाद साधला.यावेळी यात्रा प्रमुख निवृत्ती पाटील, ईश्वर रहाणे,किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील ,मुक्ताई नगर तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर,जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोडे,यात्रा सह प्रमुख रामभाऊ पाटील, विलास धायडे,किशोर चौधरी,अतुल पाटील,जि प सदस्य कैलास सरोदे,निलेश भाऊ पाटील,प स सदस्य दिपक पाटील ,योगिता वानखेडे,युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील,ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे ,प्रकाश पाटील,रविंद्र पाटील,गंभीर उन्हाळे,शशांक पाटील, श्रीकांत चौधरी, अरविंद पाटील,योगेश्वर कोळी,सिद्धार्थ तायडे,दिलीप पाटील, सागर खवले,गोकुळ चौधरी, सचिन महाले,अमोल महाजन,रुपेश पाटील,रवींद्र महाजन,सुरेश कोळी,मनोहर तायडे,देवानंद पाटील ,हैदर भाई,युनूस खान, नंदूभाऊ हिरोळे, विकास पाटील,प्रशांत भालशंकर,लक्ष्मण सापधरे,नितीन पाटील,केतन पाटील,रोहन च-हाटे, भुषण कोळी विशाल रोटे, चेतन राजपुत ,सुरेश तायडे, उमेश तायडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी बोलतांना अकिल खान म्हणाले की, नाथाभाऊ हे विकासाच्या पथावर चालणारे राजकारणी असून त्यांनी विकासकामे करताना कधीही कोणताही जातीचा धर्माचा भेदभाव केला नाही सर्व जाती धर्मासाठी काम केले सर्व जाती धर्माला समाज मंदिरे करून दिली गाव तेथे बुद्धविहार संकल्पना राबवली मुस्लिम वस्ती असणाऱ्या ठिकाणी शादिखाने बांधून दिले ,अल्पसंख्याक वस्त्यांमध्ये रस्ते, गटारी यासाठी निधी उपलब्ध करून दिला अल्पसंख्याक समाज शिक्षणाच्या प्रवाहात यावा यासाठी मुक्ताईनगर येथे अल्पसंख्याक समाजासाठी शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजची निर्मिती केली .नाथाभाऊ हे नेहमी विकास कामांना महत्व देणारे नेते आहेत. आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे आहोत अशी ग्वाही अकिल खान यांनी दिली
यावेळी तांदलवाडी येथील सरपंच सुरेखा ताई तायडे, साधना ताई कोळी, गंभीरराव उन्हाळे,शशांक पाटील, श्रीकांत चौधरी, अरविंद पाटील,योगेश्वर कोळी,दिलीप पाटील, सागर खवले,गोकुळ चौधरी, संदिप ठाकूर, शशिकांत उन्हाळे भुषण चौधरी, प्रशांत उन्हाळे,अकिल खान, शे गयास शे गुलाब, शे चांद शे गमीर, अजीज शेख, बिस्मिल्ला सै अकबर, मेहबूब हुसेन खाटीक, मांगलवाडी येथील सुरेशराव हिवराळे, वेडू भाऊ हिवराळे, सुरेश तायडे, विजय तायडे, उमेश तायडे,दिपक तायडे, बाबुराव कोळी, योगेश चौधरी, रामभाऊ तायडे, अशोक बुंदेले, ज्ञानेश्वर हिवराळे, लक्ष्मण तायडे, श्रावण तायडे, भास्कर कोळी,, छाया ताई तायडे, रावा बाई कांडेले, ज्योती ताई तायडे, सुनोदा येथिल मधुकर पाटील, उद्धव पाटील, पोपट सपकाळे, राजु उडीदकर, नामदेव चौधरी, गणपत सपकाळे, सुनिल पाटील, राजु सपकाळे, पांडुरंग पाटील, राकेश सपकाळे, कपिल जावळे, विशाल चौधरी, विलास सपकाळे, महेश सपकाळे आणि ग्रामस्थ बहुसंख्यने उपस्थित होते.