⁠ 
शुक्रवार, ऑक्टोबर 18, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | निवडणुकीचे बिगुल कधीही वाजणार शिवसैनिकांनी कामास लागावे

निवडणुकीचे बिगुल कधीही वाजणार शिवसैनिकांनी कामास लागावे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२२ । येणाऱ्या काळात कुठल्याही क्षणात राज्यातल्या स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रीक निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता असुन , ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी गाफील राहता कामा नये तर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी पुर्ण आत्मविश्वास व ताकदीने कामाला लागावे व सर्वसामान्य नागरीकांच्या हितासाठी आणी न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करावे असे शिवसैनिकांशी भेटीत जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी सांगीतले .

यावल येथे दिनांक २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता यावल पंचायत समितीच्या आवारात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) या गटाचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन, सुधीर गडकरी ( चोपडा विधानसभा संपर्क प्रमुख ) , विलास पाटील ( जामनेर विधानसभा क्षेत्र प्रमुख ) , संतोष माळी ( वरणगाव ), यांनी शिवसेनिकांची भेट घेत आगामी काळात होवु घातलेल्या नगर परिषद व जिल्हा परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी हितगुज साधुन पक्ष संघटन अधिक मजबुत करण्याच्या दृष्टीने पदाधिकारी यांनी आपले संपर्क दौरे सुरू केले आहेत.

यावेळी जिल्हाप्रमुख समाधान महाजन व सुधीर गडकरी यांनी यावल शहर व तालुक्यातील शिवसेनिकांशी चर्चा करून विविध विषयांवर माहीती जाणुन घेतली , या प्रसंगी शिवसेनेचे यावल शहरप्रमुख जगदीश कवडीवाले , तालुका उपप्रमुख शरद कोळी , यावल शहर उपप्रमुख संतोष धोबी , योगेश चौधरी , सारंगधर बेहडे , मयुर धोबी, भरत राजपुत , शकील पटेल यांच्यासह ईतर कार्यकर्ता यावेळेस उपस्थित होते

author avatar
टीम जळगाव लाईव्ह