जळगाव जिल्हामहाराष्ट्र

मोठी बातमी : पोलीस भरतीच्या जाहिरात प्रसिद्धीला स्थगिती, भरती पुढे ढकलली जाणार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२२ । राज्यातील तरुण-तरुणींसाठी राज्य सरकारने दिवाळी भेट म्हणून तब्ब्ल १४ हजार ९५६ रिक्त पदांसाठी पोलीस शिपाई संवर्गातील भरती प्रक्रिया जाहीर केली होती. पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना निराशा करणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पोलीस भरतीच्या जाहिरात प्रसिद्धीला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली आहे. या भरती प्रक्रियेला १ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार होती. मात्र, या भरतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे.

अजून एक महत्वाची माहिती म्हणजे याच बरोबर राज्य राखीव दलातील पोलीस शिपाई भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे. स्थगिती देण्यात आलेली भरतीबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहे. प्रशासकिय कारणास्तव पोलीस भरतीच्या जाहिरातीला स्थगिती देण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे.  मागील २ वर्षांमध्ये पोलीस भरती झाली नाही.

गेल्या दोन वर्षापासून देशासह राज्यात कोरोनाच्या संकटामुळे नोकरभरतीच झाली नव्हती. कोरोनाचा फटका पोलीस भरती प्रक्रियेला बसल्याने आवश्यकता असताना राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होऊ शकली नाही. राज्याची लोकसंख्या लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलीस बळाची गरज आहे. राज्य सरकाराने सुरू केलेल्या हालचालीमुळे पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाल्याचे म्हटले जात होते. मात्र आता पोलीस भरतीच्या जाहिरात प्रसिद्धीला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती मिळाली असल्याने विद्यार्थी नाखूष झाले आहेत.

कुठे किती जागा आहेत?
मुंबई – 6740
ठाणे शहर – 521
पुणे शहर – 720
पिंपरी चिंचवड – 216
मिरा भाईंदर – 986
नागपूर शहर – 308
नवी मुंबई – 204
अमरावती शहर – 20
सोलापूर शहर- 98
लोहमार्ग मुंबई – 620
ठाणे ग्रामीण – 68
रायगड -272
पालघर – 211
सिंधूदुर्ग – 99
रत्नागिरी – 131
नाशिक ग्रामीण – 454
अहमदनगर – 129
धुळे – 42
कोल्हापूर – 24
पुणे ग्रामीण – 579
सातारा – 145
सोलापूर ग्रामीण  – 26
औरंगाबाद ग्रामीण- 39
नांदेड – 155
परभणी – 75
हिंगोली – 21
नागपूर ग्रामीण – 132
भंडारा – 61
चंद्रपूर – 194
वर्धा – 90
गडचिरोली – 348
गोंदिया – 172
अमरावती ग्रामीण – 156
अकोला – 327
बुलढाणा – 51
यवतमाळ – 244
लोहमार्ग पुणे – 124
लोहमार्ग औरंगाबाद -154
एकूण – 14956

कोणत्या प्रवर्गाला किती जागा?
अनुसूचित जाती – 1811
अनुसूचित जमाती – 1350
विमुक्त जाती (अ) – 426
भटक्या जमाती (ब) – 374
भटक्या जमाती (क) -473
भटक्या जमाती (ड) – 292
विमुक्त मागास प्रवर्ग – 292
इतर मागास वर्ग – 2926
इडब्लूएस – 1544
खुला – 5468 जागा
एकूण – 14956


Related Articles

Back to top button