जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२२ । तालुक्यातील साकरी येथे घरासमोरील उकीरड्यावरून ट्रॅक्टर गेल्यानंतर झालेल्या वादात दोन गटात हाणामारी होवून त्यात दोन्ही गटातील पाच जण जखमी झाले. गुरुवार, 28 रोजी सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी परस्परविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले.
पहिल्या गटातर्फे विनोद तुकाराम घोडके (40, साकरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे ट्रॅक्टर संशयीत आरोपींच्या घरासमोरील उकीरड्यावरून गेल्याचा राग आल्याने संशयीतांनी फिर्यादीसह त्यांच्या लहान भावास शिविगाळ करीत मारहाण केली तसेच डोक्यावर लोखंडी फावडा मारून दुखापत करण्यात आली. या प्रकरणी संशयीत सुहास पितांबर बोदर, दीपक सुहास बोदर, वसंत सुहास बोदर (सर्व रा.साकरी, ता.भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसर्या गटाच्या दोघांविरोधात गुन्हा
दुसर्या गटातर्फे दीपक सुहास बोदर (37, साकरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींचे ट्रॅक्टर त्यांच्या भावाच्या घरासमोरील उकीरड्यावरून गेल्याचा जाब विचारल्याच्या रागातून संशयीत आरोपी विनोद तुकाराम घोडके, शरद तुकाराम घोडके (साकरी) यांनी फिर्यादीसह त्यांचे वडील व लहान भावास शिविगाळ करीत मारहाण केली तसेच शरद घोडके यांनी लोखंडी फावड्याच्या दांड्याने मारहाण केली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास एएसआय शामकुमार मोरे करीत आहेत.