⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 24, 2024
Home | बातम्या | जिल्ह्यात पुन्हा पाटील विरुद्ध पाटील.. आमदाराने केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

जिल्ह्यात पुन्हा पाटील विरुद्ध पाटील.. आमदाराने केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२२ । जिल्ह्यात पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदार चिमणराव पाटील यांनी आपल्याच सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात खदखद व्यक्त केली आहे. यावेळी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडला, त्याच पक्षातील माजी मंत्र्याच्या मुलासोबत गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव एका कार्यक्रमात दिसले अशी खदखद त्यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्यावर अन्याय केला, त्याच पक्षातील माझ्या प्रतिस्पर्धी आमदाराला निधी द्यायचा, व त्यांना मोठं करायचं, ही चुकीची बाब असल्याचं सांगत चिमणरावांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती दिली आहे. आमदार चिमणआबा पाटील विरुद्ध गुलाबराव पाटील हे वाक युद्ध जिल्ह्याला नवीन नाही. मात्र सरकारला १०० दिवस पूर्ण होत नाहीत, तोच शिंदे गटातील आमदार एकमेकांना भिडले असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान शिंदे गटातील मंत्री व आमदारांच्या या नाराजी नाट्यामुळे जळगाव जिल्ह्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे.

राष्ट्रवादीच्या आमदाराला मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाणी योजनांसाठी निधी दिल्याने आमदार चिमणराव पाटील हे नाराज असल्याची चर्चा होती. आता आमदार चिमणराव पाटील यांच्या मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याच्या मुलासोबत गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव दिसल्याने चिमणराव पाटलांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह