जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२२ । रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला आता आठ महिने होऊन गेले आहेत. मात्र आता रशियाने न्युक्लिअर फोर्सेस ट्रायलसाठी उतरविली आहेत. यामुळे जगात एकच खळबळ उडाली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बुधवारी रशियाच्या रणनीतिक दलांच्या प्रशिक्षणाची पाहणी केली. ही दले अण्वस्त्रांच्या हल्ल्यांना चोख प्रत्यूत्तर देण्यास सक्षम आहेत.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियावर युद्धात इराणी ड्रोन वापरल्याचा आरोप केला. रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात सुमारे 400 ड्रोनचा वापर केला आहे. त्याचवेळी अमेरिकेने रशियाला पुन्हा एकदा अण्वस्त्रांच्या वापराविरोधात इशारा दिला असून ही अत्यंत गंभीर चूक असल्याचे म्हटले आहे.
मात्र जर रशियाने अण्वस्त्र वापरले तर ती गंभीर चूक ठरेल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाला. यावेळी बायडन म्हणाले कि,. हे एक फॉल्स फ्लैग ऑपरेशन आहे असे मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. मला माहित नाही. परंतु जर तसे केले तर ती एक गंभीर चूक असेल, असे बाय़डेन म्हणाले.