जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२२ । पाचोऱ्याचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी ठाकरे गटात असलेल्या आपल्या बहिणीसोबत भाऊबीज साजरी केली. बहीण वैशाली सूर्यवंशी यांच्या घरी जाऊन आमदार किशोर पाटील यांनी भाऊबीज साजरी केली. यावेळी भाऊ-बहिणीच्या प्रेमाच्या नात्यापुढं राजकीय मतभेद गळून पडले.
राज्यासह देशात भाऊबीज उत्साहात सजारी केली जाते आहे. भाऊबिजेला भाऊ बहिणीच्या घरी जातो. ओवाळणी देतो. हे चित्र सगळीकडे पाहायला मिळतंय. पण गेल्या काही काळात महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तासंघर्षामुळे अनेक कुटुंब दोन गटात विभागली गेली. शिवसेनाफुटल्यानंतर एकाच घरात दोन गट पडल्याचं दिसून आलं. ठाकरे गट आणि शिंदे गट अशी विभागणी झालेल्या घरांना भाऊ भाउबिजीने एकत्र आणल.

यावेळी वैशाली सूर्यवंशी म्हणाल्या कि, आजच्या दिवशी आमच्या दोघांच्या मनात राजकारणाचा थोडासुद्धा विचार येत नाही. आमचे वैचारीक मतभेद असतीलही, पण आजच्या दिवसासाठी आम्ही ते बाजूला ठेवून एकत्र भाऊबीज साजरी करतो आहोत, असंही त्यांनी म्हटलं.








